बातम्या
उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खुळे झालेत; त्यांना मानसोपचार तज्ञाची तातडीची गरज : नगरसेवक अजय इंगवले
By nisha patil - 4/6/2026 11:17:59 PM
Share This News:
उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खुळे झालेत; त्यांना मानसोपचार तज्ञाची तातडीची गरज : नगरसेवक अजय इंगवले*
कोल्हापूर दि.०४ : ज्याचे उभे आयुष्य गुंडगिरी, तोडपाणी, घोडेबाजार यात गेले अशा रविकिरण इंगवले याने यापूर्वीही फक्त प्रसिद्धीपोटी जिल्ह्यातील अनेक लोकनेत्यांवर टीका केली आहे. फक्त आणि फक्त आमदार राजेश क्षीरसागर यांची बदनामी करूनच सद्या त्यांचे दुकान सुरु आहे.
राजकारण मर्यादित असाव, व्यक्तिगत टीका- टिप्पणी व आरोप करणे ही विकृती नेहमीच रविकिरण इंगवले यांच्या रक्तात भिनली आहे. महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे उबाठाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खुळा झाला आहे. त्यांना चांगला मानसोपचार तज्ञांची आवश्यकता आहे.
वास्तविक पाहता आज घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे त्यांच्या दुर्बुद्धीचे आणखी एक उदाहरण आहे. गोव्यातील कॅसिनोला भारत सरकार आणि गोवा राज्य सरकारने अधिकृतरित्या मनोरंजनाचे साधन म्हणून मान्यता दिली आहे. देश- विदेशातून अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह मनोरंजनासाठी कॅसिनोला जातात. ते गोवा राज्याच्या आर्थिक उत्पनाचे स्तोत्र आहे. पण, कोणत्या गोष्टीचा उहापोह करावा, याची काडीमात्र अक्कल रविकिरण इंगवले यांना नाही. सातत्याने ते क्षीरसागर कुटुंबियांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करतो.
राजेश क्षीरसागर यांची कार्यपद्धती अखंड कोल्हापूरवासियांना माहित असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजूर केलेला निधी व सुरु असलेली कामे जगजाहीर आहेत. त्यामुळे "हाथी चले बाजार... भोंके हजार" याप्रमाणे विकास कामाला विकास कामाने उत्तर न देता टीकेने बदनाम करण्याचाच उद्योग विरोधकांचा असणार आहे. खासकरून रविकिरण इंगवले सारख्या स्वार्थी व्यक्तीकडून आगामी काळात नागरिकांच्या मनोरंजनासाठी विदुषकी कार्यक्रम सुरुच राहतील, त्यास आम्ही शिवसैनिक कधीही भिक घालणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नगरसेवक अजय इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
उबाठा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खुळे झालेत; त्यांना मानसोपचार तज्ञाची तातडीची गरज : नगरसेवक अजय इंगवले
|