बातम्या
उंचगावात १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा समाजोपयोगी उपक्रम
By nisha patil - 7/26/2026 11:17:19 PM
Share This News:
उंचगावात १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा समाजोपयोगी उपक्रम
उंचगाव, दि. २६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उंचगाव येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा समाजोपयोगी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी मार्गदर्शन करताना, शिवसेनेची वाटचाल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' या तत्त्वावर सुरू असल्याचे सांगितले. देशात घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांचा निषेध करत, अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या युवा पिढीला ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी, करवीर तालुका शिवसेनेतर्फे गेल्या बारा वर्षांपासून छत्री वाटपाचा उपक्रम राबविला जात असून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगावचे उपसरपंच अरविंद शिंदे, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवासेना समन्वयक सचिन नागटिळक, अमर जाधव, अजित चव्हाण, शेंडगे सर तसेच प्रियदर्शनी कॉलनी, जानकीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंचगावात १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा समाजोपयोगी उपक्रम
|