बातम्या

"नीट परीक्षा पेपर फुटी,गैरव्यवहार बाबतची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा"

Union Education Minister Dharmendra Pradhan should


By nisha patil - 7/21/2026 7:46:48 PM
Share This News:



"नीट परीक्षा पेपर फुटी,गैरव्यवहार बाबतची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा"

तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके  या प्रमुख मागणी बाबत रविवारी संसदेवर काढलेल्या मोर्चा वर केंद्र शासनाने पोलीस व निमलष्करी जवान बळाचा वापर करून विद्यार्थी , विद्यार्थिनीं, पालक तसेच महिलांना  रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याच्या निषेधार्थ कागल तालुका इंडिया आघाडी, विद्यार्थी विद्यार्थिनी, विद्यार्थी संघटना, युवक कार्यकर्ते यांच्या वतीने मुरगूड पोलीस स्टेशन ते शिवतीर्थ दरम्यान धिक्कार व निषेदाच्या घोषणा देत निषेध रॅली काढून घटनेची न्यायालयीन चौकशी करून घटनेस जबाबदार असलेल्यांच्या वर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील (मॅडम) यांना देण्यात आले.
        याबाबत विद्यार्थी नेते अभिजीत दिपके व कार्यकर्ते यांनी उभे केलेल्या आंदोलनास तसेच थोर पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांचे गेले २२ दिवस सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिलेस कागल तालुका इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ जुलै सकाळी ११ वाजता कागल तहसील कार्यालयासमोर इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसाचे साखळी उपोषणास तालुक्यातील समस्त विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, स्पर्धा  प्ररीक्षार्थी , सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.  असे आवहान इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड दयानंद नानासाहेब पाटील- नंद्याळकर, युवक काँग्रेस अध्यक्ष  अमर चौगले मुरगूड शहराध्यक्ष दीपक शेणवी. NICU अध्यक्ष सुशांत पाटील. शिवाजी जाधव स्वाभिमानी संघटना अध्यक्ष नामदेव भराडे, शिवसेना तालुका संघटक मारुती पुरी बुवा, बांधकाम कामगार तालुका संघटक कॉ. दिनकर जाधव, राष्ट्रवादी (श.प. )तालुका संघटक प्रकाश तिराळे, कॉ.बबन बारदेस्कर , सामाजिक कार्यकर्ते कृष्णात सोनाळे यांनी  केले आहे.
      
        यावेळी काँग्रेस पक्षाचे  पर्यावरण तालुकाध्यक्ष राजेंद्र शिंदे, महादेव कामते, सचिन हंचनाळे , प्रकाश पार्टे, रोहन नारे, विक्रम पाटील, गौतम कांबळे ,प्रवीण कदम कुरणी,अभिजीत मिटके,  ऋषिकेश पाटील, अजित कांबळे, आकाश कोठेवाले, अरुण भोसले , दत्तात्रेय लोहार,सुनील सुतार, अतुल सुतार , सचिन कुंभार ,सुरज सातवेकर उपस्थित होते.

 


"नीट परीक्षा पेपर फुटी,गैरव्यवहार बाबतची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा"
Total Views: 8