बातम्या

उत्तूर बसस्थानक रखडले; आंदोलन मागे घेण्याचे महामंडळाचे आवाहन

Uttur bus station project stalled


By nisha patil - 8/26/2026 2:25:14 PM
Share This News:



उत्तूर बसस्थानक रखडले; आंदोलन मागे घेण्याचे महामंडळाचे आवाहन
 

आजरा : प्रतिनिधी हसन तकीलदार.  उत्तूर येथील रखडलेले एस.टी. बसस्थानकाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी १८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या धरणे व हलगी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.


 

२४ ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बांधकामासाठी ग्रामपंचायत अथवा अन्य संबंधित विभागाची परवानगी आवश्यक आहे का, याबाबत संबंधित विभागांकडे चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. महामंडळाने प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र, बसस्थानकाचे प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार, याची कोणतीही ठोस कालमर्यादा महामंडळाच्या पत्रात देण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनानंतरही उत्तूर बसस्थानकाचा प्रश्न नेमका कधी सुटणार, असा सवाल प्रवासी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
 

दरम्यान, पंचायत समिती आजरा यांनी माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीत बसस्थानक बांधकाम स्थगितीबाबत ग्रामपंचायत उत्तूरशी कोणताही लेखी पत्रव्यवहार केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.


उत्तूर बसस्थानक रखडले; आंदोलन मागे घेण्याचे महामंडळाचे आवाहन
Total Views: 34