बातम्या

ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून कुलूप

Villagers lock the Gram Panchayat office


By nisha patil - 8/20/2026 1:00:45 PM
Share This News:



ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून कुलूप

शेंडूर : प्रतिनिधी अजित बोडके   ग्रामसेवक उपस्थित नसल्याने नियोजित ग्रामसभा बरखास्त करण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेंडूर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.

शेंडूर येथे २० ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभा घेण्याच्या ठिकाणी ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

ग्रामस्थांचे विविध प्रश्न व समस्या मांडण्यासाठी ग्रामसभा महत्त्वाची असताना, ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सभा होऊ न शकल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

ग्रामसभा तातडीने घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न व म्हणणे ऐकून घ्यावे तसेच पुढील ग्रामसभेची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे


ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून कुलूप
Total Views: 17