बातम्या
शासकीय कार्यालयात वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करणेसाठी नाभिक समाजाचे निवेदन*
By nisha patil - 10/7/2026 11:28:28 PM
Share This News:
**शासकीय कार्यालयात वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करणेसाठी नाभिक समाजाचे निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-13 जुलै रोजी वीर शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा सरकारी कार्यालयामध्ये साजरा करणे बाबत आजरा तालुका नाभिक संघटनेने विविध शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाच्या पदाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सतराव्या शतकात महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाच शाह्यांना, सत्ताधाऱ्यांना मात देत मराठी मातीमध्ये स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ, यांना त्रिवार वंदन करतो.स्वराज्याचे स्वप्न साकार करत असताना राजांनी आपल्या सवंगड्यांना, मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकार केले हे करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या पन्हाळ्याच्या मातीतील नेबापूर गावच्या नाभिक समाजातील मावळा शिवा काशिद हे हुबेहूब छत्रपती शिवरायांच्या सारखे दिसायला होते सिद्धी जोहरने ज्यावेळी पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळी महाराज या वेढ्यामध्ये अडकले गेले. गडावरचा दारूगोळा व धान्य कोठार संपत आले. अशावेळी राजांनी गडातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. "लाख मेले तरी चालतील पण; लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" म्हणून यासाठी शिवा काशिद हे छत्रपती शिवरायांचे रूप घेऊन सिद्धी जोहरच्या भेटीला गेले. या भेटीत आपल्याला मरण पत्करावे लागणार हे माहीत असूनही केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या राजासाठी बलिदान पत्करलेल्या वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी 13 जुलै रोजी साजरी केली जाते. या दिवशी स्वराज्याला, छत्रपती शिवरायांना वंदन म्हणून आणि या वीर मावळ्याची आठवण म्हणून आपल्या कार्यालयामध्ये वीर शिवा काशिद पुण्यतिथी सोहळा संपन्न व्हावा व स्वराज्याच्या या मावळ्याची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण सर्वांच्या मनामध्ये रुजावी यासाठी सर्व शासकीय कार्यालयात वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करावी असे निवेदनात म्हटले आहे हे निवेदन आजरा तहसीलदार, आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, आजरा गटशिक्षणाधिकारी,मुंबई सरपंच परिषद जिल्हाअध्यक्ष यांना देण्यात आले आहे.
निवेदन देताना आजरा तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष आकाश नंदकुमार शिंदे, उपाध्यक्ष गौतम बाबुराव भोसले व निलेश साळोखे व माजी उपाध्यक्ष देव पाचवडेकर आदिजण उपस्थित होते.
शासकीय कार्यालयात वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी करणेसाठी नाभिक समाजाचे निवेदन*
|