बातम्या
विश्वास बालीघाटे प्रसिद्धीसाठी खोटी माहिती देत आहेत. त्यांचा जाहीर निषेध: माजी सरपंच शर्मिला टाकवडे
By nisha patil - 8/13/2026 7:32:42 PM
Share This News:
विश्वास बालीघाटे प्रसिद्धीसाठी खोटी माहिती देत आहेत. त्यांचा जाहीर निषेध: माजी सरपंच शर्मिला टाकवडे
शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड)/ ता.१३शिरढोण(शिरोळ) ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार मिटविण्याबाबत आम्ही कोणालाही भेटलो नाही. कुणाच्याही घरी गेलो नसताना विश्वास बालिघाटे हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खोटी माहिती प्रसार माध्यमांना देऊन प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांचे खंडन करुन निषेध करत असल्याची माहिती माजी सरपंच सौ.शर्मिला टाकवडे, भास्कर कुंभार व बाबासो हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंचायत समिती शिरोळचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, विद्यमान प्रशासक तसेच माजी सरपंच यांना लेखी नोटिसा बजावून खुलासा मागविला होता. त्यानुसार संबंधित माजी सरपंचांनी उपलब्ध कागदपत्रांसह योग्य तो खुलासा गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आपल्याकडून संबंधित काळात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. शासकीय नियमांनुसार कामकाज झाले असून सदर प्रकरण सध्या चौकशीच्या टप्प्यात आहे.
विश्वास बालिघाटे हे मागील दोन दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांतून माजी सरपंच पती व माजी सरपंच घरी येवून तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केल्याची धांदात खोटी व आरोपपूर्ण विधाने करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अथवा सरपंच पती कोणीही बालीघाटे यांच्याकडे गेले नाहीत. केवळ जाणीवपूर्वक स्वतःची प्रसिद्धी मिळवणे हाच विश्वास बालिघाटे यांचा हेतू आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचे खंडन करून बालीघाटे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.असे त्यांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन टाकवडे, शशिकांत चौधरी उपस्थित होते.
विश्वास बालीघाटे प्रसिद्धीसाठी खोटी माहिती देत आहेत. त्यांचा जाहीर निषेध: माजी सरपंच शर्मिला टाकवडे
|