बातम्या
देवर्ड ता. आजरा येथील विठ्ठलराव चव्हाण ग्रामीण सह. पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
By nisha patil - 8/27/2026 3:06:00 PM
Share This News:
**देवर्ड ता. आजरा येथील विठ्ठलराव चव्हाण ग्रामीण सह. पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*गुणवंत विद्यार्थी, अग्निवीर जवान व ज्येष्ठ सभासदांचा यथोचित सत्कार*
**आजरा(हसन तकीलदार)*- देवर्डे ता. आजरा येथील विठ्ठलराव चव्हाण ग्रामीण सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मारुती शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी चेअरमन मारुती गोरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. संस्थेचे मॅनेजर संजय पां. पाटील यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद सभेपुढे वाचन करून सादर केला. सभासदांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन चेअरमन मारुती गोरे, ज्येष्ठ संचालक तिर्थकुमार सावंत व मारुती पाटील यांनी समाधानकारकरीत्या केले. यानंतर सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षातील नियोजित विकासकामांवर व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेच्या औचित्याने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी बोर्ड परीक्षेत हायस्कूलमधून प्रथम तीन क्रमांक पटकावलेले विद्यार्थी, ऋणानुबंध परीक्षा पात्र विद्यार्थी तसेच अग्निवीर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेले जवान पवन चाळके, आकाश चाळके व पार्थ शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील ७० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या सभेस संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी बागडी, संचालक मारुती पाटील, तिर्थकुमार सावंत, बाबासाहेब तानवडे, केशव तानवडे, तानाजी पाटील, शिवाजी बुरूड, यशवंत पाटील, मारुती मळेकर यांच्यासह वसंत आडाव, भरत तानवडे, भास्कर पाटील, संभाजी गोरुले, मसाजी पाटील व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन मारुती गोरे यांनी आभार मानले
देवर्ड ता. आजरा येथील विठ्ठलराव चव्हाण ग्रामीण सह. पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
|