बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; स्पर्धात्मक शिक्षणावर भर

Vivekanand college 000


By nisha patil - 7/18/2026 6:16:51 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; स्पर्धात्मक शिक्षणावर भर

कोल्हापूर, दि. 18 : विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांचा योग्य मेळ घातल्यास बदलत्या काळातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता येते. विवेकानंद कॉलेज हे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकदृष्ट्या सक्षम आणि परिपूर्ण बनविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.

विवेकानंद कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील इयत्ता 11 वी कला व वाणिज्य शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी ज्युनिअर आर्ट्स अँड कॉमर्स विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी विज्ञाननिष्ठ शिक्षणाबरोबरच ध्येयनिष्ठ व संस्कारक्षम शिक्षण विद्यार्थ्यांना विवेकानंद कॉलेजमधून दिले जाते, असे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्थेच्या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक प्रा. यू. एच. तिजाईकर यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. गार्गी मोदी, कु. तनिष अन्सारी, कु. गौरांग लंगडे तसेच पालक प्रतिनिधी सौ. अनघा गौतम नाईक आणि पोपट बाळसू माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. पी. वेदांते आणि प्रा. सौ. ए. बी. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. सौ. एस. एन. ढगे यांनी मानले. या स्वागत समारंभास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; स्पर्धात्मक शिक्षणावर भर
Total Views: 10