बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्यांतून आरोग्य, परंपरा आणि जैवविविधतेचा जागर
By nisha patil - 9/9/2026 10:59:00 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्यांतून आरोग्य, परंपरा आणि जैवविविधतेचा जागर
कोल्हापूर दि.9 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील वनस्पतिशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या व त्यांच्या पाककृती’ या विषयावर रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख करून देतानाच त्यांच्या पौष्टिक व पारंपरिक पाककृती सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी देऊन करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील होते. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. शिर्के व सांख्यिकी विभागप्रमुख श्रीमती व्ही. एस. शिंदे यांनी केले. बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, रानभाज्यांच्या पोषणमूल्यांविषयी जनजागृती, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि आरोग्यदायी व शाश्वत आहारपद्धतीचा प्रसार हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांपासून तयार केलेल्या विविध पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण पाककृतींचे सादरीकरण केले.
आधुनिक जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वनस्पतीसंपदा आणि पारंपरिक आहारपद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित आणि ज्ञानवर्धक ठरला.
‘रानभाज्या जपा, जैवविविधता जपा; परंपरा जपा, आरोग्य जपा!’ या संदेशातून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्यांतून आरोग्य, परंपरा आणि जैवविविधतेचा जागर
|