बातम्या

विवेकानंदच्या पल्लवी पाटीलची कृषी उपसंचालकपदी निवड

Vivekananda s Pallavi Patil elected as Deputy Director of Agriculture


By Administrator - 3/19/2026 5:15:52 PM
Share This News:



विवेकानंदच्या पल्लवी पाटीलची कृषी उपसंचालकपदी निवड

दि. 18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राजपत्रित वर्ग एकच्या पदांमधील भरतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात विवेकानंद कॉलेजची माजी विद्यार्थिनी  कु.पल्लवी संपतराव पाटील यांची कृषी उपसंचालक पदावर  निवड झाली आहे. कु. पल्लवी मुख्य परीक्षेत महाराष्ट्र राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात विवेकानंद कॉलेज मधील इयत्ता अकरावी बारावी सायन्स मधील प्रवेशातून झाली . विवेकानंद कॉलेजमधून शिक्षण घेताना स्पर्धा आणि गुणवत्ता याचा समतोल राखण्याचा संस्कार आत्मसात करता आला आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर लगेचच्या प्रयत्नांमध्ये हे यश मिळवता आले. असे मत सत्कार प्रसंगी  तिने मांडले. 

कु.पल्लवी पाटील यांचा विशेष सत्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यातील हितवड या गावापासून तिच्या शिक्षणाची सुरुवात झाली.  तिचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले.  तिच्या या  यशाबद्दल  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ शुभांगी गावडे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी बी पाटील, रजिस्ट्रार श्री. एस.के.धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सत्कारप्रसंगी  ज्युनिअर सायन्स विभागप्रमुख प्रा मुकुंद नवले,  प्रा. सौ गीतांजली साळुंखे, प्रा सुदर्शन शिंदे, प्रा किशोर गुजर, प्रा डी आर पंडित, प्रा संदीप पाटील व  सायन्स विभागातील प्राध्यापक,  पालक आणि कार्यालयीन वृंद उपस्थित होते.


विवेकानंदच्या पल्लवी पाटीलची कृषी उपसंचालकपदी निवड
Total Views: 16