बातम्या
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By nisha patil - 7/20/2026 12:22:28 PM
Share This News:
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग : गवस शुभ भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेला ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोकणासह राज्यातील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बीएलओ (BLO) घरभेटीदरम्यान देण्यात येणारा गणना अर्ज (Enumeration Form) संपूर्ण व अचूक माहिती भरून तातडीने जमा करावा. एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
सुधारित कार्यक्रमानुसार ८ ऑगस्टपर्यंत घरोघरी सर्वेक्षण होणार असून, प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
|