बातम्या

पंत वालावलकर हायस्कूल मध्ये "वृक्षा" बंधन                                    

Vruksha bandhan


By nisha patil - 8/29/2026 1:53:48 PM
Share This News:



पंत वालावलकर हायस्कूल मध्ये "वृक्षा" बंधन                                    

कोल्हापूर  :  मुक्त सैनिक विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित शां.कृ.पंत वालावलकर हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधून त्यांची जपणूक करीत पर्यावरणाचा संदेश देत जनजागृती केली .

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी परिसरातील जवळपास 50 हून अधिक वृक्षांना राखी बांधून त्यांची जपणूक करण्याची शपथ घेतली त्याचबरोबर सिझन मधील फळांच्या बिया साठवून त्याचे सीडबॉल करून उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेत जमा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला . कलाशिक्षक विश्वास माळी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते . मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी उपक्रमातील सहभागी विद्यार्थी - विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतानाच शाळेतील इकोक्लबद्वारे पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले . पर्यवेक्षिका सरिता शिंदे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले, प्रमोद कुलकर्णी, समीर जमादार, सुनील साजणे, प्रा. प्रवीण चाकोते तसेच श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालयाचे छात्राध्यापक या उपक्रमात सहभागी झाले होते . संतोष पोवार यांनी मनोगत व्यक्त केले तर विमल धायगुडे यांनी आभार प्रदर्शन केले .

याचवेळी घरापासून दूर असणाऱ्या गुरुकूल मधील विद्यार्थ्यांना वालावलकर हायस्कूलमधील विद्यार्थीनींनी राखी बांधून स्नेहबंध दृढ केला . उपक्रम यशस्वितेसाठी निर्मला शेळके, पल्लवी यादव, सुनीता सप्ताळ, दत्ता नलवडे यांनी सहकार्य केले .


पंत वालावलकर हायस्कूल मध्ये "वृक्षा" बंधन                                    
Total Views: 27