बातम्या
आदर्श शिक्षक पुरस्कारात "वालावलकर"ची बाजी
By nisha patil - 8/9/2026 2:26:03 PM
Share This News:
आदर्श शिक्षक पुरस्कारात "वालावलकर"ची बाजी
तब्बल सहा उपक्रमशील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड
कोल्हापूर : मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शांतारामपंत वालावलकर हायस्कूलच्या सहा उपक्रमशील शिक्षकांची रोटरीच्या विविध शाखांद्वारे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली . शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष पोवार, सागर वाडकर, उत्तम भोये, तेजस्विनी जौंदाळ यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने विशेष समारंभात गौरवण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षा सोनल जोशी,सचिव राजेंद्र जोशी,रोटेरियन विनायक भालेकर, वनिता ढवळे,मृणालिनी इंगवले यांच्या उपस्थितीत या शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या सर्वांच्या हस्ते अनुक्रमे पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सरिता शिंदे, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कागले, सुनिल साजणे, विमल धायगुडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .
अन्य एका सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर होरायझन यांच्यामार्फत त्यांच्या ३४ वर्षाच्या सेवाकालखंडातील उपक्रमशीलतेची नोंद घेवून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी रोटरी क्लब ऑफ होरायझनचे पदाधिकारी ॲड. संदीप पोवार आणि पदाधिकारी उपस्थित होते . प्रशालेचेच उपक्रमशील शिक्षक जयवंत साखरे यांना एकनाथ शिंदे स्वाभिमानी शिक्षक सेनेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला . आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते जयवंत साखरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सपत्नीक गौरव करण्यात आला .
एकूणच शांतारामपंत वालावलकर हायस्कूलच्या अनेक उपक्रमशील शिक्षकांपैकी सहा शिक्षकांची निवड झाल्याने शाळेच्या गुणवत्तावाढीमध्ये निश्चितच फायदा होईल असे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितले . पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष पोवार, तेजस्विनी जौंदाळ यांनी पुरस्काराप्रती आपली भावनिक कृतज्ञता व्यक्त केली . हा विद्यार्थ्यांचा आणि विश्वास ठेवणाऱ्या पालक, शिक्षक यांचा पुरस्कार असल्याचे प्रांजळपणे सांगितले . प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले . रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षा सोनल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी वाय. पी. पोवार विद्यालयाच्या शिक्षिका रत्ना मौळे यांनीही पुरस्काराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली .पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले . समीर जमादार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .
आदर्श शिक्षक पुरस्कारात "वालावलकर"ची बाजी
|