बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
By nisha patil - 7/23/2026 6:34:40 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर दि. २३: विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन (पदवी आरंभ) प्रोग्रॅम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे विवेकानंद परिवारात स्वागत करून त्यांना महाविद्यालयाची कार्यपद्धती, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम, ग्रंथालय, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC),विद्यार्थी विकास विभाग तसेच करिअर मार्गदर्शन व कौशल्य विकासाच्या संधी यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अध्ययन, शिस्त, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून देत महाविद्यालयीन जीवनाचा सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपयोग करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. सनी काळे यांनी केले. सूत्रसंचालन समृद्धी चौगुले या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन डॉ. आशा सावंत यांनी मानले.
यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ . एकनाथ आळवेकर आणि वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सनी काळे प्रा.अक्षय रेडेकर, डॉ.योगेश माने, डॉ.उमेश दबडे, IQAC समन्वयक डॉ सिद्धार्थ कट्टीमनी, डॉ. डी.आर.तुपे, डॉ.ए.एस. महात डॉ. संदीप पाटील, ग्रंथपाल डॉ.नीता पाटील, डॉ.विकास जाधव, आणि इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
|