बातम्या

*हत्तीवडे ता. आजरा येथे भक्तीमय वातावरणात श्रावण मासाचे स्वागत

Welcoming the month of Shravan amidst a devotional atmosphere


By nisha patil - 8/16/2026 11:37:37 PM
Share This News:



*हत्तीवडे ता. आजरा येथे भक्तीमय वातावरणात श्रावण मासाचे स्वागत
 

*आजरा(हसन तकीलदार)-:श्रावण मासाच्या शुभारंभप्रसंगी भक्तीमय वातावरणात हत्तीवडे ता. आजरा येथे सर्व ज्येष्ठ व तरुण वारकरी मंडळींच्या उपस्थितीत पांडव पंथी, ग्रंथ दिंडी तसेच रवळनाथ मंदिरात दररोज सायंकाळी 7:30 वाजता ग्रंथ वाचन असे भक्तिमय कार्यक्रम सुरु आहेत.
   

 हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना आहे.हिंदू धर्मात हा महिना अतिशय पवित्र महिना मनला जातो. हा महिना भगवान शंकराला समर्पित असतो. अनेकजण या संपूर्ण महिन्यात किंवा दर सोमवारी उपवास करतात. निसर्ग आपल्या मुक्त हस्ताने या महिन्यात हिरवाईची उधळण करून सर्वत्र हिरवीगार सृष्टी आणि त्यात पवित्र महिना आणि पुढील सणांची चाहूल यामुळे सर्वत्र आनंदी आणि उत्साहपूर्वक भक्तीमय वातावरण असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होते व आजार वाढतात त्यामुळे आयुर्वेदाच्या व संस्कृतीच्या दृष्टीने या महिन्यात खाण्यापिण्यात पथ्य पाळली जातात. शाकाहारी भोजन व पूजा पाठ केले जाते. 
   

या श्रावण महिन्याचे महत्व जपत हत्तीवड्यात दिंडी स्वरूपात ग्रंथ रवळनाथ देवळात नेण्यात आले.रोज सायंकाळी 7:30 वाजता ज्येष्ठ नागरिक आप्पा रामा चौगुले हे देवालयात ग्रंथ वाचन करीत आहेत. वारकरी मंडळींच्या पांडव पंथी, ग्रंथ दिंडी व ग्रंथ वाचन यामुळे गावातील वातावरण उल्हासमय व भक्तीमय झाले आहे. यावेळी सरपंच शकुंतला सुतार, कुंडलिक पाटील (तंटामुक्त अध्यक्ष), बापू पाटील, पांडुरंग पाटील (उपसरपंच), सुधाकर चौगुले, भीमराव चौगुले, सिताराम पाटील, शिवाजी चौगुले, वैषाली चौगुले, बाळू कांबळे यांच्यासह वारकरी, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.


*हत्तीवडे ता. आजरा येथे भक्तीमय वातावरणात श्रावण मासाचे स्वागत
Total Views: 7