बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा
By nisha patil - 9/9/2026 3:38:06 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा
कोल्हापूर. दि. 09 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील वनस्पतिशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या व त्यांच्या पाककृती” या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी देऊन झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. सी. बी. पाटील सर होते. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. शिर्के व सांख्यिकी विभागप्रमुख श्रीमती व्ही. एस. शिंदे उपस्थित होते. बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्या व त्यांच्या पौष्टिक आणि पारंपरिक पाककृती सादर करून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला.
निसर्ग आपल्याला केवळ ऑक्सिजन देत नाही, तर तो आपल्या आरोग्याची आणि संस्कृतीचीही काळजी घेतो. आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या रानभाज्या हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
आजच्या फास्ट फूडच्या युगात आपण आपल्या पारंपरिक आहारापासून दूर जात आहोत. अशा वेळी रानभाज्या आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या परंपरेशी आणि आपल्या जैवविविधतेशी जोडणारा सुंदर दुवा आहेत.
या प्रदर्शनाचा आणि पाककृती स्पर्धेचा उद्देश केवळ वेगवेगळ्या रानभाज्या दाखवणे किंवा स्वादिष्ट पदार्थ तयार करणे नाही. त्यामागे स्थानिक जैवविविधतेची ओळख, पोषणमूल्यांची जाणीव, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश आहे.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हा उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारत आहे. वनस्पतींची ओळख प्रयोगशाळेपुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी कशी जोडलेली आहे, हे आजच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.
आजच्या स्पर्धेत प्रत्येक सहभागीने जिंकण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्याचा आणि इतरांना काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी एवढेच म्हणेन— “रानभाज्या जपा, जैवविविधता जपा; परंपरा जपा, आरोग्य जपा!” या सुंदर आणि अर्थपूर्ण उपक्रमासाठी आयोजक, परीक्षक आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा
|