बातम्या

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणी साठी प्रतिभानगर येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा        

Workshop for Headmasters at Pratibhanagar regarding


By nisha patil - 4/9/2026 3:11:41 PM
Share This News:



मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणी साठी प्रतिभानगर येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा        

कोल्हापूर  :  महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिभानगर येथील वि.स.खांडेकर विद्यालय येथे शहरातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली .

या कार्यशाळेत समाजकल्याण निरीक्षक वृषाली पाटील यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले आणि ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीं संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना समयोचित उतरे दिली . अनुसूचित जाती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती यासह अन्य पंधरा विविध शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले . प्रारंभी सुधाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले प्रकाश सुतार यांनी आभार प्रदर्शन केले .

यावेळी कनिष्ठ लिपिक संजय शिंदे, विजय भोगम, धनाजी बेलेकर, संजय गावडे, अनिकेत मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते . सर्व महानगरपालिका शाळा, खाजगी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांना कार्यशाळेचा उत्तम लाभ झाला आणि शिष्यवृत्ती संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळाली . कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले


मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणी साठी प्रतिभानगर येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा        
Total Views: 21