बातम्या

विवेकानंद महाविद्यालयात लैंगिक संवेदनशीलता आणि POSH कायद्यावर कार्यशाळा

Workshop on Gender Sensitization and the POSH Act at Vivekananda College


By nisha patil - 8/21/2026 7:21:18 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालयात लैंगिक संवेदनशीलता आणि POSH कायद्यावर कार्यशाळा

कोल्हापूर, दि. २१ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे अंतर्गत समिती आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने "लैंगिक संवेदनशीलता समजून घेणे आणि POSH कायद्याबाबत जागरूकता" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. शिल्पा भोसले होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, "महाविद्यालयाचे वातावरण सुरक्षित असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना सन्माननीय, सुरक्षित आणि भेदभावमुक्त वातावरण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. यासाठी प्रत्येकाने लैंगिक संवेदनशीलतेबाबत जागरूक असणे आवश्यक आहे."

या कार्यशाळेसाठी CS ऋतुजा माळुश्टे आणि CS कपिला टिके, माजी अध्यक्षा, कोल्हापूर चॅप्टर या संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी लैंगिक संवेदनशीलता, समानता, कार्यस्थळी सन्माननीय वर्तन याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच POSH कायदा, २०१३ च्या तरतुदी, अंतर्गत समितीची रचना व कार्ये आणि तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत व्यावहारिक उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि तक्रार निवारण यंत्रणेबाबत जागरूकता निर्माण झाली.

यावेळी अंतर्गत समितीच्या अध्यक्ष डॉ. कविता तिवडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचं मार्गदर्शन लाभले.समन्वयक, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्राने झाली.


विवेकानंद महाविद्यालयात लैंगिक संवेदनशीलता आणि POSH कायद्यावर कार्यशाळा
Total Views: 11