बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी “तणाव व राग व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 10/9/2026 7:32:48 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी “तणाव व राग व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर दि. 10 : येथील विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘तणाव व राग व्यवस्थापन’ (Stress and Anger Management) या विषयावर कर्मचारी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. IQAC समन्वयक डॉ. बी. टी. दांगट यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजयसिंह भोसले यांनी उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तणाव व राग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
दैनंदिन कामकाजातील तणावाची कारणे, तणावाचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम, रागाची कारणे आणि रागावर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या पद्धती याविषयी भोसले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भावनिक संतुलन राखणे, सकारात्मक विचारसरणी विकसित करणे, प्रभावी संवाद साधणे, आंतरवैयक्तिक संबंध दृढ करणे आणि कार्यस्थळी सकारात्मक वातावरण निर्माण करणे यासाठी विविध व्यावहारिक उपाय त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत तणावपूर्ण परिस्थितींना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्याचे तंत्र समजावून देण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. सी. बी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबरोबरच सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी “तणाव व राग व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा संपन्न
|