बातम्या

शहाजी महाविद्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा संपन्न.

Workshop on driving license procedures and road safety


By nisha patil - 8/27/2026 4:18:00 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा संपन्न.

वाहतूक सुरक्षा ही काळाची गरज : मनोज ओतारी (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी)

कोल्हापूर : शहाजी महाविद्यालयातील क्रीडा विभाग व आय क्यू ए सी विभागा मार्फत आयोजित ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा मोठ्या उत्सहास संपन्न झाली.  श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हाईस चीफ पेट्रोन तथा चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन लाभले.
       

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिमखाना विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमांमध्ये श्री मनोज ओतारी साहेब( उप प्रादेशिक परिवहन अधिकारी)यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, हेल्मेट चा वापर व वाहतुकी संदर्भात घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अशा प्रकारची कार्यशाळा घेणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले महाविद्यालय आहे असे व्वक्तव्य त्यांच्या मनोगतून व्यक्त झाले.
     

तसेच ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेवर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळेचे व्याख्याते श्री चंद्रकांत माने साहेब (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे सविस्तर रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले व ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचे प्रक्रियेबद्दल माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली.
   

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण  यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी हा वाहतुकीच्या नियमाबाबत सजक असला पाहिजे त्याचबरोबर विविध वाहतुकीबाबत घटनांचा उल्लेख करून वाहतुकीचे नियम सर्व विद्यार्थ्यांनी पाळावे याबाबत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   

सदर कार्यशाळेप्रसंगी  आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर डी मांडणीकर,जिमखाना सदस्य डॉ.डी.पी.गावडे सर,ग्रंथपाल डॉ .पी.बी पाटील सर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एन एस जाधव सर आदी उपस्थित होते.
 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री प्रशांत मोटे आणि कार्यक्रमचे आभार मराठी  विभाग प्रमुख डॉ.डी के वळवी यांनी केले.


शहाजी महाविद्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा संपन्न.
Total Views: 15