बातम्या

आजरा पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार अखेर यशोदा पोवार यांचेकडे

Yashoda Powar finally assumes charge


By nisha patil - 8/15/2026 2:17:26 PM
Share This News:



आजरा पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार अखेर यशोदा पोवार यांचेकडे
 

आजरा(हसन तकीलदार):-पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे यांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जाहीर केला होता.

त्यानुसार 30 जुलै 2026 रोजी आजरा सभापती निवडीचा कार्यक्रम पार पडला परंतु या प्रक्रियेत कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे ही जागा रिक्तच राहिली. त्याचबरोबर महिला उमेदवार फक्त दोनच असल्याने आणि त्यातील एक अपात्र ठरल्याने सभापती पदाची निवड होईपर्यंत पदभार सांभाळण्याकरिता आजरा पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी पत्र दिले आहे.
     

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मा. विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांचेकडील आदेशानुसार श्रीमती जयश्री गजानन गाडे (सौ. जयश्री मारुती कदम )पंचायत समिती सभापती /सदस्य यांना पंचायत समिती सभापती /सदस्य म्हणून निरर्ह ठरविणेत आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961मधील कलम 77(1)(क )नुसार पंचायत समिती आजरा कडील नवीन सभापती पदाची निवड होईपर्यंत तेथील सभापती पदाची कर्तव्ये आपण पार पाडणेची आहेत असे म्हटले आहे.


आजरा पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार अखेर यशोदा पोवार यांचेकडे
Total Views: 384