बातम्या

आजऱ्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणावर चाकूहल्ला

Youth stabbed over money exchange in Ajra


By nisha patil - 3/8/2026 1:33:13 PM
Share This News:



आजऱ्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणावर चाकूहल्ला
 

लोकांच्या सतर्कतेमुळे दोन संशयित ताब्यात रात्रभर अफवाना उत
 

आजरा(हसन तकीलदार):-येथील छत्रपती संभाजी चौकातील एक्सपरटो बेकर्स मध्ये दोन तरुणांनी जिसनू दिवाकर नायर (वय 24) या तरुणावर दोघा जणांनी चाकूहल्ला केला. त्यात तो जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली. पैशाच्या देवाणघेवाणीतून हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी दोन संशयित तरुणांना
एअरगन सदृश्य वस्तू व चाकूसह ताब्यात घेतले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आजऱ्यातील सुप्रसिद्ध तसेच फार पूर्वीपासून आजऱ्यात सुरु असलेली एक्सपर्टो बेकरीच्या मालकास व त्याच्या मुलग्यास रविवारी रात्री सुमारे दहाच्या दोघा संशयितानी बांधून घालून पैशाची मागणी केली. त्यातून सव्वा दहाच्या सुमारास दिवाकर नायर बेकरी मालकाने बेकरीच्या वरील मजल्यावरून खाली येऊन दोघांनी आपले हात पाय बांधले होते परंतु आपली सुटका करून घेऊन जीव वाचवून खाली आल्याचे सांगितले,पैशाची मागणी करीत आपल्या मुलाला त्यांनी मारहाण करून डांबून ठेवले असल्याचे आजूबाजूच्या लोकांना सांगितले. काही सजग लोकांनी धाडस करीत वर जाऊन त्या दोघांना अडवल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून जिसनू दिवाकर नायर (वय 24) बेकरी मालकाचा मुलगा हा या झटापटीत जखमी झाला आहे. त्याच्या पोटावर आणि डोक्याला इजा झाली आहे.जिसनुवर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी समुखलाल निषाद व राजकुमार निषाद या उत्तरप्रदेशच्या दोघा संशयितांना पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलेचे सांगण्यात येत आहे.
   

  समुखीलाल निषाद आणि राजकुमार निषाद हे यापूर्वी याच बेकरीत कामाला होते असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या दोघांनी गडहिंग्लज येथे स्वतंत्र व्यवसाय सुरु केला होता. परंतु त्यामध्ये त्यांना आर्थिक तोटा झाल्यानंतर त्यांना पैशाची चणचण भासू लागली त्यासाठी जुने पगार वसुली करण्यासाठी नायर यांच्याकडे आल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून एअरगन सदृश्य वस्तू व चाकू पोलिसांनी हस्तगत केले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
   

रात्रभर अफवाना उत... चौकात सशस्त्र दरोडा पडलाय. बेकरी मालकाच्या मुलाला गोळ्या घालून मारलेत अशा अफवाना उत आला होता. काही मिनिटातच या ठिकाणी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. तुफान गर्दीला पांगवाण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. उपपोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


आजऱ्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणावर चाकूहल्ला
Total Views: 1319