बातम्या

कोल्हापुरात भररस्त्यात तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद!

Youth who terrorized the public by brandishing a sword in the middle of the road in Kolhapur


By nisha patil - 7/20/2026 12:01:02 PM
Share This News:



कोल्हापुरात भररस्त्यात तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद!
 

कोल्हापूर, ता. १४ : शहरात बंदी आदेश लागू असतानाही भररस्त्यात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला राजारामपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून २६ इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व बी.पी. अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ऋषिकेश जयहिंद इंद्रेकर (वय २०, रा. जुना कंदलगाव नाका झोपडपट्टी, जवाहरनगर, कोल्हापूर) असे आहे. १२ जुलै रोजी सायंकाळी शेंडा पार्क चौक ते आर. के. नगर रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ तो बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले व तलवार जप्त केली.
 

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडव करीत आहेत.


कोल्हापुरात भररस्त्यात तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद!
Total Views: 38