बातम्या
कुमारी युसरा बुड्डेखान हिच्या उल्लेखनीय यशाचा यथोचित सत्कार*
By nisha patil - 9/9/2026 11:05:58 PM
Share This News:
**कुमारी युसरा बुड्डेखान हिच्या उल्लेखनीय यशाचा यथोचित सत्कार*
आजरा(हसन तकीलदार)*:-उर्दू हायस्कुल व ज्युनियर महाविद्यालय, आजरा ची विद्यार्थिनी कुमारी युसरा याह्या बुड्डेखान हिने विविध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल माध्यमिक शाळा शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेमार्फत यथोचित सत्कार करण्यात आला.
कुमारी युसरा हिने घेण्यात आलेल्या विविध परीक्षामध्ये उल्लेखनीय व घवघवीत यश संपादित करीत आपली छाप सोडली आहे. यामध्ये प्रामुख्याने सन 2025/26 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी स्कॉलरशिप परीक्षेत उर्दू माध्यम जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याने येथील माध्यमिक शाळा शिक्षक सेवकांची पतसंस्था आजरा तर्फे रोख रक्कम व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याआगोदरही युसेराने जी. टी. एस. परीक्षेत सर्व माध्यमामध्ये प्रथम क्रमांक, प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम, इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू माध्यम जिल्ह्यात प्रथम, टॅलेंट प्लस परीक्षेत राज्यात दुसरी असे उल्लेखनीय यश संपादनकेले आहे. हिच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक होताना दिसत आहे.
यावेळी संस्थेचे माजी व्हा. चेअरमन अभिजित देसाई, संस्थेचे ज्येष्ठ संचालक संतोष पोवार, संस्थेचे व्यवस्थापक पंकज देसाई कर्मचारी मोहन डोणकर तसेच याह्या बुडडेखान आदिजण उपस्थित होते.
कुमारी युसरा बुड्डेखान हिच्या उल्लेखनीय यशाचा यथोचित सत्कार*
|