बातम्या
सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. युवराज येडूरे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार
By nisha patil - 1/9/2026 4:12:31 PM
Share This News:
‘स्वच्छ पाणी – निरोगी विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य’चा संकल्प; कोनवडे, निळपणच्या शाळांपासून १२०० RO वॉटर प्लांट उपक्रमाला सुरुवात
सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. युवराज येडूरे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार; CSR निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना शुद्ध पाण्याची सुविधा
कोनवडे/निळपण : प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे आणि निरोगी पिढी घडावी, या सामाजिक बांधिलकीतून ‘स्वच्छ पाणी – निरोगी विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण शाळांसाठी १२०० RO Water Plant वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, शेणगांव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर यांच्या सामाजिक उपक्रमातून आणि CSR निधीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात विद्या मंदिर कोनवडे आणि विद्या मंदिर निळपण या शाळांपासून करण्यात आली.
या कार्यक्रमाचा शुभारंभ स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना डॉ. युवराज येडूरे म्हणाले, “ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, ही समाजाची जबाबदारी आहेच; पण त्यांना शाळेत सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळणे हीदेखील तितकीच महत्त्वाची गरज आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न केवळ एका गावाचा किंवा एका शाळेचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. म्हणूनच CSRच्या माध्यमातून ग्रामीण शाळांपर्यंत RO Water Plant पोहोचविण्याचा संकल्प केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला ग्रामीण भागातील गरजा आणि अडचणी जवळून माहिती असतात. ज्या सुविधा अनेक ठिकाणी अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्या सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हा उपक्रम प्रसिद्धीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून सुरू केला आहे.”
दोन शाळांपासून सुरुवात; १२०० प्लांटचे उद्दिष्ट
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने १२०० RO Water Plant उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात २०० शाळांमध्ये RO Water Plant सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे.
‘एक शाळा – एक RO प्लांट – हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित’ या भावनेतून हा उपक्रम पुढे नेण्यात येणार आहे.
कार्यक्रमात राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा देसाई यांनी स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे राहुल पाटील, विश्वजीत पाटील, अमित कोरे, प्रकाश पाटील, संदीप पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्या मंदिर कोनवडे येथे मुख्याध्यापिका सीमा देसाई, आशिष पाटील, समाधान पाटील, सरपंच आबाजी कांबळे, कृष्णात खतकर, रणजीत गुरव, विकास गोठणकर, यशवंत पाटील, कृष्णात गुरव, प्रकाश पाटील, महेश पाटील, अजित चव्हाण, माधुरी पाटील, शुभांगी पाटील, पोपट पाटील, योगेश पाटील, सुरेश पाटील, अशोक ढेकळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच विद्या मंदिर निळपण -
मुख्याध्यापक श्रीकांत देसाई सर, संतोष मेंगाणे, शाळा कमिटीचे दयानंद घाटगे, बाळासो मेंगाणे, संदीप पाटील, विकास मोहिते, नानासो पाटील, तानाजी पाटील, अर्जुन देसाई, पांडुरंग तोरसे येथील शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अनेकदा मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दुर्लक्षित राहतो. अशा परिस्थितीत शुद्ध पाण्यासारखी मूलभूत सुविधा शाळेपर्यंत पोहोचविण्याचा पुढाकार घेऊन स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले आहे.
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. युवराज येडूरे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांची गरज ओळखून सुरू केलेला हा उपक्रम केवळ RO Water Plant देण्यापुरता मर्यादित नसून, ‘ग्रामीण विद्यार्थ्यांचे आरोग्य म्हणजे महाराष्ट्राचे भविष्य’ या व्यापक विचाराचा भाग आहे.
कोनवडे आणि निळपण येथून सुरू झालेला हा उपक्रम आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि पुढे महाराष्ट्रातील विविध भागांतील गरजू शाळांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे.
“आज एका शाळेत शुद्ध पाण्याची सुरुवात झाली आहे; उद्या हजारो विद्यार्थ्यांच्या निरोगी भविष्याची सुरुवात होईल!”
सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. युवराज येडूरे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार
|