राजकीय

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस वाढत चालला गुंता

hatkangale loksabha election


By Administrator - 1/30/2024 2:27:57 PM
Share This News:



हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस  वाढत चालला गुंता

हातकणंगले लोकसभा बहुरंगी लढत होणार?
 विद्यमान खासदार वर मतदारसंघात नाराजी


प्रतिनिधी - पांडुरंग फिरींगे
हातकणंगले लोकसभा वार्तांकन

सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यात विभागला गेलेला हातकणंगले मतदार संघ आहे. या मतदारसंघाचा जागा वाटपाचा गुंता निवडणूक जवळ येईल तसे वाढत चाललेला दिसत आहे. येथे माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी पूर्वतयारी म्हणून पायी चालत मतदारसंघ भिजून काढला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाच्या दराचा विषय घेऊन कारखान्यावर आंदोलने करून वातावरण गरम केले होते.एकंदरीत त्यांनी आपला प्रचार पूर्ण केलेला दिसत आहे.

विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे गटात जाऊन गद्दारी केली, असा आपल्यावर ठाकरे गटाकडून शिक्का मारून घेतला आहे.


 यामुळे माने यांनी मतदारसंघात कामे केली असली तरीही, मतदारसंघात  मतदारांशी  संपर्क ठेवलेला नाही. यावेळी त्यांच्या बाबतीत मतदार संघात नाराजी व्यक्त केली जात आहे,त्यांच्या आई मा.खास निवेदिता माने यांनी खासदार झाल्यावर मतदारसंघात संपर्क कमी ठेवला होता. यामुळे त्यांना  मतदारांनी झिडकारले होते. याचीच प्रचिती सध्या त्यांच्या चिंरजीव वरती येण्यास वेळ लागणार नाही?


 कोल्हापूरच्या दोन्ही जागा गत निवडणुकीत शिवसेनेने जिंकल्या होत्या. पण मागील काही महिन्यात गल्ली पासून दिल्लीपर्यंत राजकारण दुषित बनले आहे.  काही महिने राजकीय नेत्यांनी आपले राजकारण पंचगंगा नदीत  बुडवून नदी दूषित केली. त्या पद्धतीने राजकारण दूषित बनल्याने राजकीय समीकरणे बदलले आहेत.


 महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे गटाकडून कोल्हापूरच्या दोन्ही जागा आपण लढविणार म्हणून शिवसेना सांगत आहे. पण दोन्ही  ठिकाणी सेनेला  उमेदवार मिळवताना नाकीनऊ   होणार आहे. यांचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील पाटील यांना उमेदवारी मागणीसाठी सध्या कार्यकर्ते यांनी जोर धरला आहे.

हातकणंगले मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, ते कसे कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ शाहूवाडी जनसुराज्य विनय कोरे, सध्या भाजपचे घटकपक्ष, हातकलंगले राष्ट्रीय काँग्रेस राजूबाबा आवळे, शिरोळ अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत.इचलकरंजी मतदारसंघात अपक्ष विजयी झालेले प्रकाश आवाडे यांनी भाजपला समर्थन दिले आहे. तर सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघात शिराळा राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक आहेत. तर इस्लामपूरचे आमदार जयंतराव पाटील आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत. 

 मागील लोकसभा निवडणूक राजू शेट्टी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली होती. तर विद्यमान खासदार माने यांनी भाजप सेनेकडून निवडणूक लढवली होती. यात  राजू शेट्टी यांना नवख्या धैर्यशील मानेनी पराभूत केले होते. 
 महाविकास आघाडी राजू शेट्टी यांच्या संपर्कात होती,राजू शेट्टी हे तयारीत होते. याच वेळी शरद पवार यांनी आपल्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण कुठे माशी शिकली अनं राजू शेट्टी आपक्ष लढणार म्हणून जाहीर केले. तर इचलकरंजी    महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते नी शेट्टी यांना विरोध केला आहे.
राजू शेट्टी यांनी  अपक्ष निवडणूक लढवायचे ठरवून दोन्ही पक्षापासून लांब राहण्याचे ठरवले आहे. व त्यांनी अपक्ष निवडणूक लढविणार म्हणून जाहीर केले आहे. जुन्या फॉर्म्युलानुसार ही जागा ठाकरे गटाला देण्याचे ठरले आहे. ठाकरे गटाकडे सध्या तरी निवडून येण्यासारखा एकही उमेदवार दिसत नाही. काँग्रेस पक्षाचीही अवस्था अशीच आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला ही जागा मिळावी यासाठी फारच जोरदार आहे. प्रतीक पाटील यांना राजकारणात आणण्याचा जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे.

प्रतीक पाटील राजारामबापू कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी तो व्यवस्थित चालविलाअसून, ते शिराळा व वाळवा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. तसेच हातकणंगले तालुक्यातही संपर्क वाढवला आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार माने हे असून त्यांना उमेदवारी मिळणार म्हणून नुकताच कोल्हापूरच्या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे.

भाजपकडे हातकणंगले मतदारसंघात कमळावर विजयी झालेला एकही आमदार नाही. मध्यंतरी प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे व खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू राहुल महाडिक या दोघांनीही लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. पण भाजपकडून त्यांना उमेदवारी दिलेली नाही.त्यांची समजूत काढली होती. तसेच सध्या कुरुंदवाड चे सुपुत्र डॉक्टर संजय पाटील हे भाजपकडून तिकीट मागणीसाठी प्रयत्न करत आहेत. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे हा मतदारसंघ असल्याने भाजप सध्या आपल्या कार्यकर्ते ला देणार नाहीत. कारण विजयाची खात्री असलेला उमेदवार निवडायचा आहे. विद्यमान खासदार माने यांचे चंद्रकांत पाटील व धनंजय महाडिक यांच्याबरोबर चांगले  संबंध आहेत. त्यामुळे माने यांनाच उमेदवार मिळणार असून तेही आता सध्या प्रचारात आहेत. त्यामुळे खासदार माने ,राजू शेट्टी ,प्रतीक पाटील ,अशी तिरंगी लढत होईल

पण वंचित आघाडी काय निर्णय घेतात. तसेच अपक्ष लक्ष्मण तात्या तांदळे यांनीही मतदार संघात संपर्क ठेवून लढवण्यासाठी तयारीत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मनसेची निर्णायक मते आहेत. मनसेच्या वतीने कोण उमेदवार उभे करण्यात येणार आहे की कुणाला पाठींबा देण्यात येणार आहे. यावर निकालाची सुत्रे फिरु शकतात. तसेच आप पक्षाच्या वतीने चाचणी सुरु आहे. इतरही पक्ष अंदाज घेऊन निवडणूक रिंगणात उभे राहिले तर  हातकणंगले लोकसभा मतदारसंघ बहुरंगी लढतीकडे वाटचाल करत असल्याचे सध्या तरी चित्र आहे.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस वाढत चालला गुंता