डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८० विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकरी

D Y Patil Engineering 680 students job in reputed company
By Administrator - 7/19/2023 4:58:56 PM
Share This News:

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या
६८० विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये नोकरी

 डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०२३ बॅच मधील तब्बल  ६८० विद्यार्थ्यांना नामाकिंत राष्ट्रीय -आतंराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी अनामिका डकरे हीची अडोबे कंपनीमध्ये तब्बल ६४ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली. कोल्हापूमध्ये मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे.

 उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याने यावर्षी विक्रमी संख्येने प्लेसमेंट करता आल्याचे डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व  कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी सांगितले. 


   याबाबत अधिक माहिती देताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम करिअर घडविण्यासाठी सर्वच प्राध्यापक वर्ग मेहनत घेत असतो. तब्बल ६४ लाख़ रुपयांचे पॅकेज मिळवणारी अनामिका डकरे ही राज्यातील केवळ दुसरी विद्यार्थिनी आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच तृतीय वर्षात शिकणारी रेवा भागवत हिला मेटा (फेसबुक) कडून तब्बल ४ लाखाची फेलोशीप मिळाली आहे. सर्वच विद्यार्थ्याना नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाना चांगले यश मिळाले असून  २०२२ -२३ मध्ये ६५० प्लेसमेंटचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरलो याचे समाधान वाटत आहे. 
   डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, यावर्षी १८० कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे तृतीय वर्षातील विद्यार्थांना सुद्धा प्री -प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या आहेत.  आयटी क्षेत्राबरोबरच मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्सच्या विद्यार्थानाही चांगल्या जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. ३७६  विद्यार्थांनी ४ लाख पेक्षा जास्त सॅलरी पॅकेज आणि २२६ हुन अधिक विद्यार्थ्यांना मल्टी ऑफर्स  मिळाल्या  आहेत. 
   महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे कंपन्यांची गरज ओळखून कोडिंग स्किल्स , गुगल डेव्हलपर क्लब, परदेशी भाषा, बिजनेस कम्युनिकेशन स्किल्स , सॉफ्ट स्किल आणि ऍप्टिट्यूड ट्रेनिंग दिले जाते. महाविद्यालयाला मिळालेले  ऑटोनॉमस  दर्जा  आणि नॅक 'अ '  आणि एनबीए मानांकन,  विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि इतर बाबी विचारात घेऊन काही बहुराष्ट्रीय कंपन्या थेट कॅम्पसमध्ये येऊन अंतिम वर्षाच्या मुलांच्या लेखी परीक्षा,समूह चर्चा  आणि मुलाखती घेऊन निवड केल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.    


    कॅम्पस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार म्हणाले,  या वर्षी २०२३ च्या तब्बल २०८ विद्यार्थ्याना डीएक्ससी टेक्नोलॉजी, केपीआयटी, व्होडाफोनसह विविध कंपन्यामध्ये जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. यातील ५ विद्यार्थ्याना ‘ब्रिलिओ’ मध्ये १० लाखाचे पॅकेज मिळाले आहे. मेकॅनिकल,सिव्हिल,केमिकलच्या विद्यार्थांनी अल्ट्राटेक, विप्रो पारी , रिलायन्स, वरली, शोभा डेव्हलपरस,आरडीसी, प्राज इंडस्ट्री, RLE  आणि इतर कोअर कंपन्यामध्ये नोकरी मिळवल्या आहेत. या विद्यार्थांनी आयटी क्षेत्रातसुद्धा ७.५ लाख पेक्षा जास्त पॅकेजच्या ऑफर्स मिळवल्या आहेत. 
    प्राचार्य  डॉ. संतोष चेडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी विविध क्लब, फ्रेंच, जर्मन आणि जापनीज भाषांचे कोर्सेस या माध्यमातून  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासासाठी तयारी करून घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांचा औद्योगिक विश्वाशी संबंध येणासाठी विविध सामंजस्य करार , समाजपयोगी प्रकल्प आणि इंटर्नशिप असे उपक्रम वर्षभर राबविले जातात
   हेड ट्रेनिंग प्रा.मकरंद काईंगडे म्हणाले, प्रथम वर्षापासून विद्यार्थांना सॉफ्ट स्किल्स , टेक्निकल आणि अॅप्टीट्युट ट्रेनिंग दिले जाते, त्याचा फायदा प्लेसमेंटसाठी होतो. बदलत्या काळानुसार कोडींग स्किल्स बरोबरच एआर -व्हीआर, आरपीए, एडब्ल्यूएस, क्लाउड कॉम्प्यूटिंग, सायबर सीक्युरीटीचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच स्पर्धा परीक्षा तयारी, परदेशी उच्च शिक्षणच्या तयारीसाठी तज्ञ लोकांचे सेमिनार घेतले जातात.
   या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि सर्व विभाग प्रमुख यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.