बातम्या

कै. सौ. सत्वशीला  साळुंखे यांच्या स्मरणार्थ  कुमार विद्यामंदिर , हणमंतवाडी शाळेस  शैक्षणिक  मदत

Educational assistance to Kumar Vidyamandir


By Administrator - 3/16/2026 4:40:19 PM
Share This News:



कै. सौ. सत्वशीला  साळुंखे यांच्या स्मरणार्थ  कुमार विद्यामंदिर , हणमंतवाडी शाळेस  शैक्षणिक  मदत

 कोल्हापूर दि. 16 :   कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ  त्यांचे चिरंजिव श्री. पुरुषोतम साळुंखे यांचेमार्फत दि.16.03.2026 रोजी कुमार विद्या मंदिर, हणमंतवाडी या शाळेस शैक्षणिक मदत म्हणून  क्रीडा साहित्य दिले तसेच रक्कम रुपये 5000/- रोख स्वरुपात  देणगी देण्यात आली.

संकल्प 51 अंतर्गत कै. सौ. सत्वशीला साळुंखे यांच्या स्मरणार्थ  दर महिन्यास एका शाळेस श्री. पुरुषोतम हितेंद्र साळुंखे  यांचेमार्फत अशा 51 शाळेस मदत  कार्य तसेच विविध सामाजिक उपक्रम यामध्ये वृक्षारोपन, वृध्दाश्रम व अनाथ आश्रमास मदत केली जाते.  तसेच  दि.16.03.2026 रोजी कुमार विद्या मंदिर, हणमंतवाडी या शाळेस शैक्षणिक मदत म्हणून  क्रीडा साहित्य दिले तसेच रक्कम रुपये 5000/- रोख स्वरुपात  देणगी देण्यात आली.

यावेळी पाणी पुरवठा समिती संचालक नुतन सुर्यवंशी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक मा.आनंदराव पाटील सर यांचेकडे रक्कम व क्रीडा साहित्य्‍  सुपुर्द करण्यात आले.  याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष सरदार तिबीले, शिवाजी नरके यांनी दिलेली रक्कम ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वापरण्यात येईल याची ग्वाही दिली.   या सर्व कामाचे नियोजन त्यांचे चिरंजिव श्री. पुरुषोतम हितेंद्र साळुंखे  श्री सागर सुर्यंवशी व प्रतिक पानारी यांनी केले.


कै. सौ. सत्वशीला  साळुंखे यांच्या स्मरणार्थ  कुमार विद्यामंदिर , हणमंतवाडी शाळेस  शैक्षणिक  मदत
Total Views: 11