MHT - CET परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट चा दबदबा कायम
By Administrator - 6/13/2023 3:03:32 PM
Share This News:
MHT - CET परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट चा दबदबा कायम
श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे अतुलनीय यश
इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी वैभवी पवार जिल्ह्यात प्रथम
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम एस टी सी इ टी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथल्या श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश मिळवून महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्यूटच्या यशाचा दबदबा कायम ठेवलाय.
या परीक्षेत इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी कुमारी वैभवी पवार हिने पीसीएम विभागात 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय त्याचबरोबर ओम खोत यांनी 99.97 सुजल बनकर यांनी 99.97 गायत्री भाट हिने 99.95 दिग्विजय कुंभार याने 99.95 हर्षवर्धन पाटील याने 99.95 सोहम बोळाज याने 99.93 कशिष जैन हिने 99.92 तर सारंग कुलकर्णी याने 99.92% गुण मिळवून यश संपादन केलय. त्याचबरोबर एकूण 53 विद्यार्थी 99% अधिक गुण मिळवले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाने श्रद्धा इन्स्टिट्यूट उज्वल निकालाच्या बाबतीत अव्वल असल्याचा स्पष्ट झालंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष ए आर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना तांबे यांनी आम्हाला काहीच बोलावे लागत नाही,आमचं यश सर्वकाही बोलून जाते. विद्यार्थी आणि पालक यांचा इन्स्टिट्यूट वरील विश्वास हा श्रद्धा इन्स्टिट्यूटला नेहमीच बळ देण्याचे काम करत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच ध्यास घेऊन श्रद्धा इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जीवनात करिअरच्या दृष्टीने आशेचा किरण बनत चालली आहे.
याचे कारण एम एच टी, सी इ टी, जे ई ई मेन ऍडव्हान्स नीट मेडिकल या सर्व परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल आहे. असं प्रतिपादन यावेळी केलं. तर हे निकाल म्हणजे श्रद्धा इन्स्टिट्यूट घेत असलेल्या प्रामाणिक कष्टाची पोचपावती आहे अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ए आर तांबे, समन्वयक एम एस पाटील, कौंदाडे मॅडम, पवार मॅडम, अभिषेक तांबे ,अक्षय तांबे आणि सृष्टी तांबे यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
 
|