तेज कम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
By Administrator - 12/6/2023 4:30:21 PM
Share This News:
तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूट च्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि विशेष शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा सरस्वती
उजळाईवाडी येथे उत्साहात पार पडला .कार्यक्रमाची सुरवात तेज इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ . स्नेहल चोरगे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजनाने झाले चाटे शिक्षण समूह,कोल्हापूर विभाग चे प्राचार्य प्रकाश यादव यांनी विद्यार्थांना करिअर कसे घडवावे याबद्दल विशेष शैक्षणिक मार्गदर्शन केले.तसेच तेज कॉम्पुटरचे राजेंद्र चोरगे यांनी ११ वी , डिप्लोमा व ITI च्या प्रवेश प्रकिया व त्यांना लागणारे विविध शासकीय दाखले व त्यासाठी लागणारी विविध कागदपत्र याबद्दल मार्गदर्शन केले
. MKCL रोहित पिसे यांनी क्लिक कोर्सेस याबद्दल मार्गदर्शन केले . यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व बक्षीस वितरण समारंभ पार पडला आणि इन्स्टिट्यूट मध्ये घेण्यात आलेल्या प्रेसेंटेशन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेले कू .कौस्तुब नागावकर , कू . प्राची कुडीत्रेकर, कू . प्रतीक्षा पारसे, कू . स्वरूप वारके , कू . सलोनी चौगले , कू . पोर्णिमा दगडे , कू. कृष्णा पाटील , कू. हर्षवर्धन पाटील . यांना विशेष भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले
. कार्यक्रमासाठी तेज इन्स्टिट्यूट चे स्टाफ सरोजिनी मगदूम ,श्रुती मोरे , साक्षी धोतरे यांच्यासह तेज कॉम्पुटर इन्स्टिट्यूट शाखा उजळाईवाडी व नेर्ली - तामगाव चे विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चाटे शिक्षण समूह, शाखा व्यवस्थापक,साकोलीचे भारत भोसले यांनी केले .
 
 
|