व्यंकटराव हायस्कूलचे भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत यश
By Administrator - 1/19/2026 12:46:53 PM
Share This News:
*आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्र नवी मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षे मध्ये उज्जवल असे यश संपादन केले. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एकूण 164 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील कु. स्वरा मोहन मोटे, कु. विराज बाळकृष्ण नातवेकर, कु. परिणीता विक्रम जावळे या तीनही विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ पदक व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत असे यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य एम. एन. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे.शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, नियोजनबद्ध अभ्यास, योग्य मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे आयोजन या उल्लेखनीय कार्याबद्दल भूगोल परीक्षा केंद्र, नवी मुंबई यांच्यातर्फे मिळालेल्या 'उपक्रमशील भूगोल शिक्षक' या पुरस्काराने श्रीमती एम. व्ही. बिल्ले यांना सन्मानित करण्यात आले तसेच सर्व भूगोल विषय शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी विशेष सहकार्य विभाग प्रमुख एस. वाय. भोये व पी.व्ही. पाटील यांचे लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ यांचेही प्रोत्साहन लाभले .तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख एस. वाय. भोये, पी. व्ही. पाटील ,ए.आय.चौगुले, व्ही. एच. गवारी, एम. एस. शिंपी, एस.बी. पाटील ,श्रीमती एम.व्ही. बिल्ले,सौ. एस.वाय.देसाई , सौ.ढेकळे मॅडम या सर्वच विषय शिक्षकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
|