डीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय उपक्रमास भरघोस प्रतिसाद

In D K T E I am talking about Rajawada there has been an overwhelming response
By Administrator - 12/6/2023 12:49:06 PM
Share This News:


इचलकरंजी : प्रतिनिधी   येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मी राजवाडा बोलतोय - ओपन हाउस सेशन ऍट कॅम्पस हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमास इंजिनिअरींग ला ऍडमिशन धेवू इच्छुक विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याला ८०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमाची सुरवात रोपाला पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी स्वागतपर मार्गदर्शन करुन कार्यक्रमाची पार्श्‍वभूमी सांगितली. राजवाडयात या, पहा व नंतर आपले मत ठरवा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ ए.के. घाटगे यांनी इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सार हे प्रा. डॉ .सौ. अश्‍विनी रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतात सर्वांसमोर मांडले.
कृष्णा दायमा, सुमोद दानोळे, अमेरिकेहून आलेल्या सलोनी पुरंदरे, शिवतेज थोरात तसेच २५ लाखाचे पॅकेज मिळालेला शिवतेज डंबाळ या आजी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजय खूळ यांनी पालक म्हणून संस्थेशी असलेले नाते स्पष्ट केले. यानंतर सर्वजणांची गटवार विभागणी करुन सर्वांना महाविद्यालय दाखविण्यात आले. तेथेही विद्यार्थी व शिक्षकांशी सर्वांचा मुक्त संवाद झाला.    
सोशल डीन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी प्रभावी सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सौ. सपना आवाडे, प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, सर्व डीन्स, विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.