बातम्या
कामगार टिकले तरच कारखानदारी मजबूत होईल" – शरद पवार
By nisha patil - 9/18/2025 4:49:28 PM
Share This News:
कामगार टिकले तरच कारखानदारी मजबूत होईल" – शरद पवार
साखर उद्योगासाठी सामंजस्याची भूमिका महत्त्वाची...
पन्हाळ्यात शरद पवारांचे मार्गदर्शनमहाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने पन्हाळा येथे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगाच्या टिकावासाठी शेतकरी, कामगार आणि कारखानदार यांच्यात सामंजस्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
"हा व्यवसाय टिकावा, शेतकरी आणि कामगार टिकावेत यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीला बळकट करण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कारखानदारीसाठी राज्यकर्त्यांनी ठोस निर्णय घेणेही आवश्यक आहे," असे पवार यांनी स्पष्ट केले.
कामगार टिकले तरच कारखानदारी मजबूत होईल" – शरद पवार
|