ताज्या बातम्या

आजऱ्यात पावसाच्या तूरळक सऱ्या

Heavy rains are expected today


By Administrator - 2/23/2026 11:16:25 AM
Share This News:



आजऱ्यात पावसाच्या तूरळक सऱ्या


आजरा (हसन तकीलदार):- सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि वाढलेला उष्मा यामुळे आजरेकर त्रस्त झाले होते. परंतु दुपारी साडेतीनच्या सुमारास दाटून आलेल्या ढगातून मेघ गर्जेनेसह पावसाच्या सरीनी धरणीला अलिंगन दिले. पावसाच्या सरिमुळे वातावरण अगदी आल्हादायक झाले.
     रमजानचा महिना सुरु असल्यामुळे उष्म्यात रोजेदार आपले रोजे पूर्ण करीत आहेत. परंतु अचानक आलेल्या पावसाच्या सरी वातावरणात थंडावा निर्माण करीत वातावरण अगदी प्रफुल्लित झाले. त्यामुळे रोजेदारांना थोडे शांत वाटले.तापलेली जमीन पावसाच्या सरिमुळे थंड झाली तर मातीचा कस्तुरी सुगंध मनाला आनंद देऊन गेला. पावसाच्या सरी जादा नसल्या तरी पडलेल्या सरिमुळे जमीन थंड झाली आणि आजऱ्यात उडणारी धूळ काही प्रमाणात कमी झाली. या पहिल्या पावसाचा आनंद जर बालचमुनी घेतला नाही अर्थच उरणार नाही. पावसाच्या सरी सुरु होताच गल्लीतील बालचमू पावसाच्या सरी अंगावर घेत स्वछंदपणे उड्या मारून आनंद घेऊ लागले. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. घरच्यांची नजर चुकवून पावसात भिजण्याचा आनंद त्यांनी घेतला. पंधरा ते विस मिनिटे थोड्या सरी पडल्या बालचमुना ढीगभर आनंद देऊन गेला. तुटून गेलेल्या ऊसालाही याचा फायदा होणार आहे असे शेतकऱ्यांचे मत आहे.


आजऱ्यात पावसाच्या तूरळक सऱ्या
Total Views: 135