ताज्या बातम्या
पिंपळगाव खुर्दमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे लोकार्पण उत्साहात
By nisha patil - 2/21/2026 4:54:50 PM
Share This News:
पिंपळगाव खुर्दमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे लोकार्पण उत्साहात
मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त घेतले मनोभावे दर्शन
पिंपळगाव खुर्द :- पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात झाला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज गावाला भेट देत हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्यावतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, गावासह पंचक्रोशीची हनुमानावर अपार श्रद्धा आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदार निधीतून सुंदर मंदिराचे बांधकाम झाले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांना उत्तर देताना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले की, लोकवर्गणी व विकास निधीतून करावयाचे श्री. बसवेश्वर मंदिराचे शिखर, श्री. महादेव मंदिर व श्री. रेणुका मंदिर यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.
आज दिवसभरात महाप्रसादाचेही आयोजन केले होते. यावेळी सरपंच सौ. शितल नवाळे, उपसरपंच सदाशिव चौगुले, अशोकराव नवाळे, महेश चौगुले, बंडा तेलवेकर, राहुल पवार, अशोक वठारे, आप्पासाहेब मगदूम, विश्वनाथ कूट, राजाराम मोरे, सुरेश आवटे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
पिंपळगाव खुर्दमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे लोकार्पण उत्साहात
|