ताज्या बातम्या
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
By nisha patil - 8/16/2025 5:49:47 PM
Share This News:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर, दि. 16 : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.15 वाजता संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथून वाहनाने शाहूनगर, दौलतनगर राजारामपुरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता आगमन व रेणुका भक्त मंडळ रेणुका मंदिर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
(स्थळ- गोखले विद्यालयाजवळ, शाहूनगर, दौलतनगर राजारामपुरी). सकाळी 11.15 वाजता कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर संचलित दे. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे नव्याने सुरु 11 वी सायन्स व बी.एससी कोर्सेस नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- आझाद चौक, कोल्हापूर). सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर). सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. सायकांळी 7 वाजता डॉ. संजय शा. पाटील यांचे चिरंजीव सुमित यांच्या साखरपुडा सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ- पॅव्हेलियन हॉटेल, असेब्ली रोड, कोल्हापूर) सायंकाळी 7.15 वाजता संभाजीनगर निवासस्थान, कोल्हापूर येथून वाहनाने सांगलीकडे प्रयाण.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
|