शैक्षणिक
व्यंकटराव येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन संपन्न
By nisha patil - 10/16/2025 10:43:50 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन व्यंकटराव शिक्षण संकुलात संपन्न झाला.. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे सचिव अभिषेक शिंपी, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार प्राथमिक मुख्याध्यापक आर.व्ही. देसाई, यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
ग्रंथपाल टी.एम. गुरव यांनी पुस्तकांचे प्रदर्शन मांडले व वाचनाचे महत्त्व पी.व्ही. पाटील यांनी सांगितले. प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांनी मिसाईल मॅन ,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याबद्दल व त्यांनी देशासाठी केलेल्या महान कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. त्यांच्या जीवनावरील अग्निपंख हे पुस्तक विद्यार्थ्यांनी जरूर वाचावे असे सांगितले.
डॉ. अब्दुल कलाम यांना लहान मुलं फार आवडायची ते जिथे जातील तिथे त्यांच्या सभोवती लहान मुलं, युवक यांचा घोळका जमायचा आपल्या भारत देशातील नवयुवकांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. कार्यक्रमाचे आयोजन इ.9वी क वर्ग शिक्षक विद्यार्थी यांनी केले. एम. एस. पाटील , सौ. व्ही.ए. वडवळेकर व आर.टी.देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हात धुवा दिनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. व हात धुण्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले..
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
व्यंकटराव येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन संपन्न
|