बातम्या
६ लाखांच्या कर्जापोटी २ कोटी ५२ लाखांची वसुली; कोल्हापुरात सावकारांचा धक्कादायक प्रकार
By nisha patil - 2/10/2026 4:03:30 PM
Share This News:
६ लाखांच्या कर्जापोटी २ कोटी ५२ लाखांची वसुली; कोल्हापुरात सावकारांचा धक्कादायक प्रकार
व्यवसायासाठी घेतलेल्या ६ लाख रुपयांच्या कर्जापोटी खासगी सावकारांनी तब्बल २ कोटी ५२ लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. कर्जाची रक्कम आणि व्याजाच्या नावाखाली पैसे उकळताना कुटुंबाला ठार मारण्याची तसेच दोन वर्षीय मुलीला ओलीस ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
गीता स्वप्निल मोरे वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर, सध्या चिंतामणी पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खासगी सावकारी प्रकरणात कारवाई करत सिद्धेश मिलिंद गायकवाड वय २५, अजिंक्य संभाजी जाधव वय २४ आणि स्वाती सुनील सिन्नूर या तिघांना अटक केली आहे.
अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील स्वप्निल जाधव लाला शेठ, सरिता मिलिंद गायकवाड, तेजस चंद्रकांत माने, गायत्री अजिंक्य साळोखे-गायकवाड आणि अजिंक्य अशोक साळोखे यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
६ लाखांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल २ कोटी ५२ लाख रुपये वसूल केल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
६ लाखांच्या कर्जापोटी २ कोटी ५२ लाखांची वसुली; कोल्हापुरात सावकारांचा धक्कादायक प्रकार
|