मनोरंजन

फक्त ₹61 मध्ये BSNL कडून 1000 चॅनेल्स आणि OTT सेवा

1000 channels and OTT services from BSNL for just ₹61


By nisha patil - 9/22/2025 11:35:17 AM
Share This News:



टीव्ही पाहण्यासाठी दरमहा किमान ₹200-₹300 रिचार्ज लागतो. HD चॅनेल्स किंवा OTT साठी ही रक्कम ₹600-₹1000 पर्यंत जाते. मात्र BSNL ने ग्राहकांसाठी फक्त ₹61 मध्ये IFTV (Integrated Fiber TV) नावाचा नवा प्लॅन सुरू केला आहे. यात महिन्याला 1000+ SD आणि HD चॅनेल्स मिळतील.

Skypro किंवा PlayboxTV अॅपमधून मिळणार प्रवेश

या सेवेसाठी ग्राहकांकडे BSNL भारत फायबर (FTTH) कनेक्शन असणे आवश्यक आहे. सेवा वापरण्यासाठी Skypro किंवा PlayboxTV अॅप टीव्हीवर इन्स्टॉल करावे लागेल. FTTH नंबर वापरून लॉगिन करता येईल. सेट-टॉप बॉक्सची गरज नाही. ही सेवा फक्त BSNL नेटवर्कवरच चालेल.

OTT सेवांचा समावेश

या पॅकमध्ये Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. त्यामुळे वेब सिरीज, चित्रपट आणि शो सहज पाहता येतील.

सेवा सुरू करण्याची पद्धत

ग्राहकांना WhatsApp वर 18004444 या नंबरवर “Hi” लिहून पाठवावे लागेल. दिलेल्या मेनूतून Activate IFTV पर्याय निवडून सेवा सक्रिय करता येईल.

देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार BSNL सिम

BSNL आणि भारतीय पोस्ट विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार, आता देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये BSNL ची सिम कार्ड्स आणि रिचार्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.

1.65 लाख पोस्ट ऑफिसेस बनणार विक्री केंद्र

सुमारे 1.65 लाख पोस्ट ऑफिसेस BSNL सिम व टॉप-अप सेवांसाठी विक्री केंद्र म्हणून काम करतील. डाकघरातील कर्मचाऱ्यांना BSNL कडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना अधिक सोयीस्कररीत्या सेवा मिळणार आहे.


फक्त ₹61 मध्ये BSNL कडून 1000 चॅनेल्स आणि OTT सेवा
Total Views: 38