खेळ
१० हजार महिलांची झिम्मा-फुगडी स्पर्धा, ५ लाखांची बक्षिसं...
By nisha patil - 9/16/2025 11:03:50 AM
Share This News:
कोल्हापूर : भागीरथी महिला संस्थेतर्फे खासदार महोत्सवांतर्गत मंगळवारी कोल्हापुरात भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी तब्बल १० हजार महिलांनी नोंदणी केली असून, विजेत्यांसाठी तब्बल ५ लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत.
या उत्साहवर्धक कार्यक्रमाला अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्वेता कामत, सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहून स्पर्धेला रंगत आणणार आहेत.
कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ‘चॅनेल बी’ (क्रमांक ५३२) आणि यूट्यूबवरून होणार असून, प्रेक्षकांसाठी आकर्षक रिल बनवण्याची स्पर्धाही खास आकर्षण ठरणार आहे.
१० हजार महिलांची झिम्मा-फुगडी स्पर्धा, ५ लाखांची बक्षिसं...
|