बातम्या
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १०० वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी
By nisha patil - 4/19/2025 11:23:02 PM
Share This News:
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १०० वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर | डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने मणक्यावरील १० रुग्णांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. या उपक्रमातील ही १०० वी यशस्वी शस्त्रक्रिया असून, आतापर्यंत १०२ रुग्णांवर मोफत सर्जरी करण्यात आली आहे.शस्त्रक्रियेनंतर केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
या उपक्रमामध्ये डॉ. शेखर भोजराज, डॉ. एस. ए. लाड, डॉ. तुषार देवरे यांच्यासह अस्थिरोग, भूलतज्ञ आणि प्रशासकीय विभागाचे डॉक्टर व पदाधिकारी उपस्थित होते.हा उपक्रम गेली ५ वर्षे राबवला जात असून गरीब व गरजवंत रुग्णांसाठी वरदान ठरतो आहे.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १०० वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी
|