बातम्या
१०५ वर्षांची ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरमध्ये
By nisha patil - 4/26/2025 2:56:37 PM
Share This News:
१०५ वर्षांची ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरमध्ये
पहिल्याच शो मध्ये कोल्हापूरकरांचे धमाल मनोरंजन
पूर्वीच्या काळी सर्कस येत होत्या तेव्हा लहान मुलांसह बाल वृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता. कारण सर्कसमध्ये लहान मुलांना पालक वर्ग या ठिकाणी सहभागी असणाऱ्या जनावरांना दाखविण्यासाठी आणत होते.आता मात्र शासनाने जनावरांना बंदी घातल्याने सर्कस मध्ये केवळ कुत्री पहावयास मिळणार आहेत.जरी इतर जनावरांचा समावेश नसला तरी वेगवेगळे खेळ सादर करून निखळ मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये शुक्रवारपासून सुरू झाली आहे. आयर्नविन ख्रिश्चन मैदान इथं ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे. काल सायंकाळी याचं उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आलं.आणि पहिल्या शोला सुरुवात झाली.करवीरवासीयांनी तब्बल पंधरा वर्षानंतर कोल्हापुरात दाखल झालेली ग्रेट बॉम्बे सर्कस पहावी असे आवाहन व्यवस्थापक आर.एम.पिल्लई, यांनी केले आहे.ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन आली असून या सर्कसमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे. अफ्रिकन, मणिपुर, नेपाली, रशियन, इथोपियन, बंगाली, आसाम आणि आंतरराष्ट्रीय कलाकार चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. कोल्हापूरकरांसाठी उन्हाळा सुट्टी मनोरंजनाची मेजवानी ग्रेट बॉम्बे सर्कस च्या माध्यमातून समोर आली आहे.
१०५ वर्षांची ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरमध्ये
|