शैक्षणिक

दहावी-बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर; फेब्रुवारीपासून होणार सुरुवात

10th 12th vi exam dates announced


By nisha patil - 10/14/2025 11:45:44 AM
Share This News:



पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या २०२६ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली.

शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पार पडतील. याच काळात माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत.

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच एनएसयूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान, तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत.

📍या वेळापत्रकामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन करण्यास मोठी मदत होणार आहे.


दहावी-बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर; फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
Total Views: 41