विशेष बातम्या
शहाजी विधी महाविद्यालयात ११११ दीप प्रज्वलन सोहळा उत्साहात पार
By nisha patil - 10/18/2025 3:24:35 PM
Share This News:
शहाजी विधी महाविद्यालयात ११११ दीप प्रज्वलन सोहळा उत्साहात पार
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार स्वयंसेवक प्रतिष्ठानचे उद्घाटन आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते
शिक्षण परिषद शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर येथे भव्य “११११ दीप प्रज्वलन” कार्यक्रम व देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार स्वयंसेवक प्रतिष्ठान या नव्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम यांनी भूषविले, तर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी प्रसाद मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, पैलवान दीनानाथ सिंह, वैभव पेडणेकर, प्राचार्य प्रविण पाटील, मैदर्गी मॅडम, उत्तम पाटील, कुलकर्णी सर, वकील गडगे, अशोक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजी विधी महाविद्यालयात ११११ दीप प्रज्वलन सोहळा उत्साहात पार
|