विशेष बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ११३ बदल्या

113 transfers of Gram Panchayat officers in Kolhapur district


By nisha patil - 5/28/2025 4:48:33 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ११३ बदल्या

करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांत दीर्घकाळ कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उर्वरित ९ तालुक्यांत बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी ११३ अधिकाऱ्यांच्या बदल्या पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेत पूर्ण करण्यात आल्या.

ही प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव आणि मनीषा देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. २३ मे २०२५च्या शासन निर्णयानुसार झालेल्या या बदल्यांत ८२ प्रशासकीय, ११ विनंती, २० आपसी अशा बदल्यांचा समावेश आहे.

संगणक प्रणालीद्वारे रिक्त जागा दाखवून ज्येष्ठतेनुसार निवड करून बदल्या करण्यात आल्या. काही कर्मचाऱ्यांना ठराविक तालुका सोडावा लागल्याने नाराजी व्यक्त झाली, तरीही प्रशासकीय समानीकरण पाळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले


कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ११३ बदल्या
Total Views: 97