विशेष बातम्या
आरटीईमध्ये 1200 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित...
By nisha patil - 7/8/2025 2:59:54 PM
Share This News:
आरटीईमध्ये 1200 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित...
शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आश्वासन; लवकरच मुख्याध्यापकांची बैठक
कोल्हापूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत पात्र असलेले सुमारे 1200 विद्यार्थी खासगी शाळांमध्ये प्रवेशापासून वंचित राहिल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. काही शाळांनी फीची मागणी करत पालकांची दिशाभूल केली असून, विद्यार्थ्यांना "नॉट अप्रोचड" म्हणून दाखवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिले असून, लवकरच खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. ‘आप’ने फसवणूक झालेल्या पालकांना उद्यम नगर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आरटीईमध्ये 1200 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित...
|