शैक्षणिक
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा 125 वा वर्धापन दिन उत्साहात 125 वर्षांचा शैक्षणिक वारसा
By nisha patil - 4/18/2026 3:20:50 PM
Share This News:
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा 125 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा 125 वा वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग विजयराव बोंद्रे दादा यांनी संस्था परिसरातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास तसेच श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण यावेळी झाले.
संस्थेच्या कार्याची, प्रगतीची, विकासाची माहिती यावेळी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण यांनी दिली.संस्थेच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजर्षी शाहू छत्रपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अतुल पाटकर, श्री शाहू आयटीआयचे प्राचार्य श्री वागरे सर,साई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा पाटील मॅडम, जव्हार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार सर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
डॉ. प्रशांत पाटील यांनी संयोजन केले.प्रा. प्रशांत मोटे यांनी आभार मानले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा 125 वा वर्धापन दिन उत्साहात 125 वर्षांचा शैक्षणिक वारसा
|