बातम्या

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांमध्ये १२७८ ग्राहकांचा सहभाग, १२३८ तक्रारींवर जागेवर तोडगा

1278 customers participated in Mahavitaran


By nisha patil - 9/9/2025 11:41:10 PM
Share This News:



महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांमध्ये १२७८ ग्राहकांचा सहभाग, १२३८ तक्रारींवर जागेवर तोडगा

कोल्हापूर, दि. ९ : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सोमवारी (दि. ८) जिल्ह्यातील शाखा कार्यालयांवर घेण्यात आलेल्या १९६ ग्राहक मेळाव्यांचा लाभ तब्बल १२७८ ग्राहकांनी घेतला. यामध्ये आलेल्या १२३८ तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आला, तर ४० प्रलंबित तक्रारींना विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले.

📌 विभागनिहाय सोडवलेल्या तक्रारी :

  • कोल्हापूर शहर विभाग : १३८/१३८

  • ग्रामीण १ विभाग : ३५३ पैकी २३७

  • ग्रामीण २ विभाग : ११० पैकी ९९

  • गडहिंग्लज विभाग : २०८ पैकी १९९

  • इचलकरंजी विभाग : २०६ पैकी २०५

  • जयसिंगपूर विभाग : २६३ पैकी २६०

यावेळी नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, कृषिपंप भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटर तक्रारी अशा प्रमुख मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला. स्मार्ट टीओडी मीटर संदर्भातील तक्रारींवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

महावितरणकडून ग्राहकांना पीएम सुर्यघर योजना, कुसुम बी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांची माहिती देण्यात आली.

महावितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै महिन्यातील मेळाव्यात ६१२, तर ऑगस्ट महिन्यातील मेळाव्यात १४४० ग्राहकांनी सहभाग घेतला होता. महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या वेळेत शाखा कार्यालय स्तरापर्यंत ग्राहक मेळावे आयोजित केले जात आहेत.


महावितरणच्या ग्राहक मेळाव्यांमध्ये १२७८ ग्राहकांचा सहभाग, १२३८ तक्रारींवर जागेवर तोडगा
Total Views: 53