राजकीय

मलकापुरात शेतकरी विकास पॅनलचा एकछत्री विजय; १३ पैकी १३ उमेदवार विजयी

13 out of 13 candidates win


By nisha patil - 8/12/2025 11:50:31 AM
Share This News:



शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील श्री केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत यश मिळवत १३ पैकी १३ही उमेदवार विजयी झाले. या भव्य विजयाबद्दल आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विजयी उमेदवारांमध्ये ज्ञानदेव चव्हाण, भिकाजी कोकाटे, विष्णू कोकाटे, भगवान पाटील, विठ्ठल पाटील, रामचंद्र पाटणेकर, बापू रवंदे, शामराव तळेकर, राजेश शित्तूरकर, सुवर्णा पाटील, तेजस्विनी पाटील, लक्ष्मी गोसावी आणि रुपाली परीट यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला धनंजय पाटील (आप्पा), बाबासो पाटील, तानाजी पाटील, सुभाष हुजरे, युवराज तळप, चंद्रकांत तळप, आबाजी पाटील, रोहिदास पाटील, डॉ. पृथ्वीराज पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मलकापुरात शेतकरी विकास पॅनलचा एकछत्री विजय; १३ पैकी १३ उमेदवार विजयी
Total Views: 29